Eknath Shinde : दसरा मेळाव्यावर एकनाथ शिंदे म्हणाले- शक्तिप्रदर्शन नव्हे, शेतकऱ्यांची सेवा हाच दसरा मेळावा, परंपरा अबाधित ठेवणार
शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा यावर्षी होणार असला तरी विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील पूर स्थिती लक्षात घेता त्या भागातील शिवसैनिकांनी मुंबईत न येता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.