पवार काका – पुतण्याच्या दोन राष्ट्रवादींच्या आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेची पाचर; पुणे + पिंपरी – चिंचवड मध्ये घातला अडसर!!
पवार काका – पुतण्याच्या दोन राष्ट्रवादींच्या आघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पाचर; पुणे + पिंपरी चिंचवड मध्ये घातला अडसर!!, अशी राजकीय परिस्थिती महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण झाली. भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीतून बाजूला काढून ठेवल्यानंतर पवार काका – पुतण्यांचे पक्ष एक आघाडी करून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक लढवतील, अशी शक्यता निर्माण झाली. कारण दोन्ही पक्षांमधल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांवर तसा दबाव आणला आणि आघाडी करण्याचा आग्रह धरला. याला अपवाद फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप ठरले. त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्यास नकार दिला. पण पवार काका पुतण्यांच्या दोन्ही राष्ट्रवादींचे बाकीचे नेते आघाडीसाठी अनुकूलच राहिले.