Shivraj Singh Chouhan : केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले- तामिळनाडूने पात्र शेतकऱ्यांची नावे द्यावीत, ती योजनेत जोडू!
लोकसभेत मंगळवारी तामिळनाडूच्या एका खासदाराने केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेवरून प्रश्न विचारला. या प्रश्नाच्या उत्तरात कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, मी तामिळनाडू सरकारला विनंती करतो की, कुणी पात्र लाभार्थी असेल तर पीएम किसान सन्मान निधीपासून वंचित असेल तर त्यांनी नाव पोर्टलवर अपडेट करावे.