बंधुता परिषदेमुळे समाजात एकीचे वातावरण निर्माण होईल; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचा विश्वास; बंधुता परिषद २०२६ चे कराडमध्ये आयोजन
महापुरुषांना जातीच्या बंधनात अडकवून समाजात तेढ निर्माण केली जात आहे, पण अशा बंधुता परिषदांतून समाजात एकीचे वातावरण निर्माण होईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.