Minister Shivendra Raje Bhosale : मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले- देवेंद्र फडणवीस हे हिमालयासारखे नेते, राजकारणासाठी त्यांनी कधी समाजाचा वापर केला नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वंचितांचे ओबीसींचे नेते नाही तर मराठ्यांचे पण नेते आहेत. त्यांनी ओबीसी विरोधी भूमिका घेतली नाही. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता त्यांनी आरक्षण दिले आहे, असे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस हे हिमालयासारखे नेते आहेत, राजकारणासाठी त्यांनी समाजाचा वापर केला नाही, त्यामुळे आरक्षणासाठी कोण बोलत असेल त्याकडे दुर्लक्ष करा, असे भोसले यांनी म्हटले आहे. क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त सोहळ्यात बोलताना शिवेंद्रराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.