Shivamogga : कर्नाटकातील शिवमोगा येथे धर्म विचारून तरुणावर हल्ला; हिंदू असल्याचे सांगितल्यावर मारहाण, 50,000 लुटले
शनिवारी रात्री कर्नाटकातील शिवमोगा येथे चार जणांनी एका तरुणावर हल्ला केला. एफआयआरनुसार, आरोपींनी त्याला विचारले, “तू मुस्लिम आहेस की हिंदू?” जेव्हा त्या तरुणाने तो हिंदू असल्याचे सांगितले तेव्हा त्यांनी त्याला मारहाण केली आणि त्याच्या खिशातून ५०,००० रुपये चोरले.