Rohit Pawar : रोहित पवारांचा दावा- शिवसेनेच्या मंत्र्यांना इन्कम टॅक्सची नोटीस; स्वत: शिंदेंच्या कुटुंबातील सदस्यालाही ईडीची नोटीस
एकनाथ शिंदेंच्या सर्व मंत्र्यांना आयकर विभागाची नोटीस गेली असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. एकनाथ शिंदेंच्या कुटुंबातील एका सदस्याला देखील ईडीची नोटीस गेलेली असल्याचेही त्यांनी सांगितले. ते आज छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यात सुरू असलेल्या पक्षप्रवेशांवरही संभावना व्यक्त केल्या.