• Download App
    Shiv Sena UBT | The Focus India

    Shiv Sena UBT

    Bhaskar Jadhav : आदित्य ठाकरेंसाठी विरोधी पक्षनेते पदाचा त्याग करेल; सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षनेत्याची भीती वाटते, भास्कर जाधवांची टीका

    नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षांनी विरोधी पक्ष नेत्यावर सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने टीका केली आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षनेत्याची भीती वाटते, विरोधी पक्षनेता दिला तर सरकारमधील सहकारी त्याला माहिती देऊन आपल्याला अडचणीत आणतील अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे सरकार विरोधी पक्षनेत्यावर कोणताही निर्णय घेत नाही, अशी टीका जाधव यांनी केली आहे.

    Read more

    Uddhav Thackeray : केंद्राने ‘पेगासस’चे नाव बदलून ‘संचार साथी’ केले, उद्धव ठाकरे यांचा आरोप

    स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या सायबर सुरक्षेसाठी केंद्राने आणलेले संचार साथी अॅप हे मुळात हेरगिरीसाठी वापरण्यात येणारे पेगासस तंत्रज्ञान असल्याचा मोठा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. सरकारने पेगाससचे नाव बदलून संचार साथी केले. हा जनतेची हेरगिरी करण्याचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मतदान करणाऱ्या लोकांवर पाळत ठेवण्याऐवजी देशावर हल्ले करणाऱ्यांवर जनर ठेवावी, असे ते म्हणालेत.

    Read more

    Uddhav Thackeray : EC अन् न्यायालयावर न बोललेलेच बरे; उद्धव ठाकरे यांचे हायकोर्टाच्या आदेशावर भाष्य

    निवडणूक आयोग व न्यायालयावर न बोललेलेच बरे, अशा मोजक्या शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या मतमोजणी पुढे ढकलण्याच्या आदेशाचा खरपूस समाचार घेतला. या प्रकरणी आदित्य ठाकरे पक्षाची भूमिका मांडतील, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंना महायुतीत कुणीही विचारत नसल्याचाही दावा केला. सध्या त्यांना (शिंदे) तिकडे कोणती किंमत देत नाही. भाजप आता सरळ सांगत आहे की, फक्त नंबर 1 ला महत्त्व असते, नंबर 2 वगैरे काहीही नसते, असे ते म्हणाले.

    Read more

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दावा- संसदेत वंदे मातरम म्हणण्यावर बंदी; नाशिकमधील वृक्षतोडीलाही केला विरोध

    केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने संसद भवनात वंदे मातरम म्हणण्यावर बंदी घातल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. सरकारने संसदेत वंदे मातरम म्हणण्यास मनाई करणारी अधिसूचना जारी केली आहे. ही काय गोष्ट आहे? यामागे कुणाचे डोके आहे? माझे खासदार संसदेत जाऊन वंदे मातरम म्हणतील. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी त्यांना बाहेर काढून दाखवावे, असे ते म्हणाले. भाजपचे हिंदुत्त्व ढोंगी आहे. भाजपचे मुंह में राम बगल में अदानी, असल्याचा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. अदानी हा शब्द कॉन्ट्रॅक्टरचा प्रतीक झालाय, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. कुंभमेळ्याचे कारण सांगून नाशिकमध्ये वृक्षतोडीचा घाट घातला जातोय. ही जागा कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातली जातेय, असा आरोपही त्यांनी केला.

    Read more

    Mahesh Kothare : महेश कोठारे म्हणाले- मी मोदीभक्त, मुंबईचा महापौर भाजपचाच होईल; संजय राऊत म्हणाले – तात्या विंचू रात्री येऊन गळा दाबेल!

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमुळे अवघ्या राज्याचे राजकारण तापले आहे. त्यातच चित्रपट अभिनेते तथा दिग्दर्शक महेश कोठारे यांनी मुंबईचा महापौर भाजपचाच होईल असे विधान करून हे वातावरण आणखी तापवण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी महेश कोठारेंवर निशाणा साधत ते नक्की मराठीच आहेत ना? असा सवाल केला आहे. तात्या विंचू रात्री येऊन तुमचा गळा आवळेल, असा खोचक टोलाही राऊतांनी यावेळी कोठारेंना हाणला.

    Read more

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा भाजप कार्यकर्त्यांना सल्ला- इतिहासात पापाचे धनी होऊ नका, तुम्ही कोणते विष पोसत आहात हे डोळे उघडून पाहा

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भाजपच्या कार्यकर्त्यांना आपल्या कृत्याकडे नीट डोळे उघडून पाहण्याचे आवाहन केले. इतिहासात आपल्या नावाची पापाचे धनी म्हणून नोंद होऊ देऊ नका. त्यामुळे आपण काय करत आहात व कोणते विष पोसत आहात याकडे एकदा डोळे उघडून नीट पाहा, असे उद्धव भाजप कार्यकर्त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना म्हणालेत.

    Read more

    Ajit Pawar : ‘हंबरडा’ मोर्चा काढणाऱ्यांनी सत्तेत असताना काय केले? अजित पवारांचा सवाल, उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षणाचा सल्ला

    अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काढलेल्या ‘हंबरडा’ मोर्चावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. सरकारच्या विरोधात मोर्चा काढणाऱ्यांनी आपण सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी नेमके काय केले, याचे आत्मपरीक्षण करावे, असा टोला त्यांनी लगावला. वडगाव येथील नवले लॉन्स येथे शनिवारी जनसंवाद कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यापूर्वी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

    Read more

    Sushma Andhare : सरन्यायाधीश भूषण गवई तुम्ही पापी आहात; सुषमा अंधारे यांचे खुले पत्र; RSSच्या कार्यक्रमाला नकार देता म्हणजे काय?

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांना एक खुले अनावृत्त पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याच्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत ही घटना नेमकी का घडली? याचे काही संदर्भ दिले आहेत. विशेषतः त्यांनी देशातील जातव्यवस्थेवरही या पत्राद्वारे प्रहार केला आहे. त्यांचे हे पत्र सोशल मीडियात चांगलेच व्हायरल झाले आहे.

    Read more

    Priyanka Chaturvedi : ऑपरेशन सिंदूर यशस्वी मोहीम- ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदींकडून कौतुक

    शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, ऑपरेशन सिंदूर हे एक यशस्वी मोहीम होती. यात दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आहेत. आपल्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. राजनाथ सिंह हे एक आदरणीय संरक्षण मंत्री आहेत. ते देशाला काय घडले याची माहिती देऊ शकले असते. प्रत्येक प्रश्न विरोधी पक्षाकडून येत नसतो. काही प्रश्नांची उत्तरे देणे ही त्यांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. देशातील जनतेच्या मनातील प्रश्न विरोधी पक्षाने उपस्थित केले आहेत. याचे मी स्वागत करते. सत्ताधारी पक्ष त्यांचे उत्तर देईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आज चर्चा होईल, मला आशा आहे की पंतप्रधान दोन्ही सभागृहांना उपस्थित राहतील, असेही त्या म्हणाल्या.

    Read more

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले- निवडणूक जाहीर झाली की राज ठाकरेंसोबत चर्चा करू

    अनेक वर्षांनी आम्ही दोघे एका व्यासपीठावर एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी, असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. परंतु, त्यानंतर राज ठाकरे यांनी युतीबद्दल सावध भूमिका घेतली असून मराठीच्या मुद्यासाठी आम्ही एकत्र आलो असून यात राजकीय मुद्दा नसल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आज पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक जाहीर होऊ द्या, मग चर्चा करू शकतो.

    Read more

    Raj Thackeray : मराठी शिकणार नाही, काय करायचे ते करा; व्यावसायिक सुशील केडियांचे राज ठाकरे यांना थेट आव्हान

    गत काही दिवसांपासून मराठी भाषेच्या मुद्यावरून राज्याचे राजकारण तापले आहे. सरकारने प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषेची सक्ती करणारा जीआर मागे घेतला. पण त्यानंतर मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या विरोधात 5 जुलै रोजी विजयी मेळावा आयोजित करण्याची घोषणा केली. यामुळे मुंबईतील वातावरण तापले असताना आता उद्योगपती सुशील केडिया यांनी राज ठाकरेंसारख्या लोकांना नाटक करण्याची परवानगी मिळेत असेपर्यंत आपण मराठी शिकणार नसल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केडिया यांना या प्रकरणी योग्य ते उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

    Read more

    Shiv Sena UBT शिवसेना ‘UBT’ने जाहीर केली आणखी एक उमेदवार यादी !

    जाणून घ्या, या यादीत किती उमेदवारांची नावे घोषित केली गेली आहे? विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने उमेदवारांची आणखी एक […]

    Read more