• Download App
    Shiv Sena Shinde Group | The Focus India

    Shiv Sena Shinde Group

    Eknath Shinde : मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार; बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला शिवसेनेचा महापौर व्हावा ही कार्यकर्त्यांची भावना – एकनाथ शिंदे

    मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून सध्या शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत मुंबईत महायुतीचाच महापौर होणार असल्याचे म्हटले आहे. महापालिका निवडणुकीत मुंबईकरांनी महायुतीला पसंती दिली आहे, आम्ही जनमताचा आदर करणार. विरोधकांकडून अफवा पसरवण्यात येत असून त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे शिंदे म्हणाले. तसेच बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा असावा ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते, असेही शिंदे म्हणाले.

    Read more

    Imtiaz Jaleel : संजय शिरसाट यांच्या मुलीवर गुन्हा का नाही? जलील यांचा सवाल, तलवार नाचलवल्याचा आरोप

    महापालिका निवडणुकीत विजयी झाल्यानंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत तलवार नाचवल्याप्रकरणी मंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांच्यावर गुन्हा का दाखवण्यात आला नाही? असा सवाल एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, मालेगाव महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने एमआयएमचा पाठिंबा मागितल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

    Read more

    Eknath Shinde : शिवसेना घाबरणारी पार्टी नाही, त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत, हॉटेलमधील नगरसेवकांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना इशारा

    मुंबईचा महापौर कोणाचा होणार? यावरून कमालीची गुप्तता आणि रस्सीखेच पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व २९ नगरसेवकांना वांद्रे येथील ‘ताज लँडस् एन्ड’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले आहे. आज त्यांनी या नगरसेवकांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी शिंदेंनी संवाद साधला आहे.

    Read more

    Sangeeta Thombare : बीडमध्ये शरद पवार गटाला धक्का; माजी आमदार संगीता ठोंबरेंचा शिवसेनेत प्रवेश, केज मतदारसंघात शिंदे गटाची ताकद वाढणार

    जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावरच आता बीडच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. संगीता ठोंबरे यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेशाने शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का बसला आहे. तसेच संगीता ठोंबरे यांच्या पक्षप्रवेशाने बीडमध्ये शिंदे गटाची ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.

    Read more

    Eknath Shinde : नकली को किया ढेर, UBT को पता चला कौन असली शेर; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

    “आम्ही केवळ विधानसभाच नाही, तर राज्यातील 70 नगरपालिका जिंकलो. नकली को किया ढेर, UBT को पता चला कोण असली शेर” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. नगरपरिषदांच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला मिळालेल्या यशानंतर ते मुंबईत आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी एमआयएमच्या दोन नगरसेवकांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

    Read more