Shirsat :शिरसाट म्हणाले- 2029ला भाजप-शिवसेना स्वतंत्रपणे लढू शकते, राजकारणात बाँड किंवा ॲग्रीमेंट काहीही नसते
प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो. राजकारणात बाँड किंवा ॲग्रीमेंट काहीही नसते. त्यामुळे भाजप व शिवसेना 2029 ला स्वतंत्रपणे लढू शकते का? तर लढू शकते, असे विधान राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या दोन्ही सत्ताधारी पक्षांच्या वाटा वेगळ्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी त्यांनी सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केलेल्या बच्चू कडू यांनाही टोला हाणला.