Shinde’s : राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे सूचक विधान
महाराष्ट्रात सध्या आमदारांचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. कोणी मारामारी करत आहे, तर कोणाच्या घरात पैशांनी भरलेली बॅग दिसून येत आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात मोबाइलवर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान केले आहे.