Shinde Slams Thackeray : शिंदेंची ठाकरेंवर टीका- 3 वर्षांपासून फक्त शिव्या-शाप सुरू; एवढ्या लवकर रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पाहिला नाही
विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. 3 वर्षांपासून माझ्या नावाने फक्त शिव्या-शाप सुरू आहेत. सभागृहात दोन दिवस चर्चा जाळली, मी अंबादास यांचे कौतुक करत होतो, कोणाला काय इतके लागण्याचे कारण नव्हते. पावसाळ्यात छत्र्या उगवतात की बेडूका, परंतु एवढ्या लवकर रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पाहिला नाही, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.