Shinde Sena : युतीचे जागावाटप जाहीर होण्यापूर्वीच डोंबिवलीत एकट्या शिंदे सेनेचा विजय निर्धार मेळावा!!
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली येथे शिवसेना विजय निर्धार मेळावा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. यावेळी आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा महापालिकेवर फडकवण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले. पण युतीचे जागावाटप जाहीर होण्यापूर्वीच हा मेळावा घेतल्याने युतीबाबत संशय बळावला.