Radhakrishna Vikhe Patil : शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ; सरकारने जरांगेंची मागणी केली मान्य; विखे पाटलांची माहिती
मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. त्यानंतर देखील जरांगे पाटील आंदोलनावर ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना म्हटले की हे फडणवीसांचे षड्यंत्र असून मी ते उधळून लावणार असल्याचा इशारा दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.