Shehla Rashid : शेहला राशिदवर देशद्रोहाचा खटला चालणार नाही; एलजींनी खटला चालवण्याची परवानगी मागे घेतली
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) माजी उपाध्यक्षा शेहला राशिद यांच्याविरुद्धचा देशद्रोहाचा खटला मागे घेण्यास दिल्ली न्यायालयाने मान्यता दिली आहे. मुख्य महानगर दंडाधिकारी अनुज कुमार सिंह यांनी २७ फेब्रुवारी रोजी सरकारी वकिलांनी दाखल केलेल्या अर्जावर हा आदेश दिला.