Shashi Tharoors : ‘जर काँग्रेसला माझी गरज नसेल तर…’, शशी थरूर यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण!
देशभरातील आपल्या अनेक मोठ्या नेत्यांसह सतत जनाधार कमी होत चाललेल्या काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा अडचणी येऊ शकतात. यावेळी काँग्रेस हायकमांडला केरळमधून झटका बसण्याचे संकेत मिळाले आहेत. पक्षाचे खासदार शशी थरूर यांनी असे विधान केले आहे की, आता त्यांनी आरपारचा निर्णय घेतला आहे असे दिसते.