Shariful Islam : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या शरीफुल इस्लामची आर्थर रोड तुरुंगात ओळख परेड
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी शरीफुल इस्लामला पोलिसांनी नुकतेच अटक केली. बुधवारी आर्थर रोड तुरुंगात शरीफुल इस्लामची ओळख परेड काढण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शरीफुल इस्लामची ओळख पटवण्यासाठी सैफची स्टाफ नर्स अरियामा फिलिप आणि आया जुनू देखील परेड दरम्यान उपस्थित होत्या.