Adani-Pawar : सुप्रिया सुळे म्हणाल्या- गौतम भाई मोठ्या भावासारखे, अदानी म्हणाले- शरद पवार माझे मार्गदर्शक, तर अजितदादा म्हणाले- मोठं झाल्यावर लोक टीका करतात
गौतम भाई आणि प्रीती भाभी हे माझ्यासाठी केवळ पाहुणे नसून, ते माझ्या हक्काच्या मोठ्या भावासारखे आणि वहिनीसारखे आहेत. गेल्या 30 वर्षांपासून आमचे प्रेमाचे आणि विश्वासाचे नाते आहे,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अदानी कुटुंबाविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात गौतम अदानी आणि प्रीती अदानी यांचे स्वागत करताना त्या बोलत होत्या.