Uddhav Thackeray : कोरेगाव -भीमा हिंसाचाराच्या चौकशीचे पवारांचे पत्र सीएम कार्यालयात; उद्धव ठाकरेंचे आयोगाला उत्तर
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशीची मागणी करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाठवलेले पत्र सध्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे असणे आवश्यक आहे, असे प्रतिज्ञापत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर सादर केले. आपण आता मुख्यमंत्रिपदावर नाहीत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर किंवा आयोगाने या पत्राची मागणी सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यालयाकडे करणे योग्य ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.