Sharad Pawar : अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार सक्रिय; दूषित झालेल्या नीरा नदीची केली पाहणी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती व येथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची भावना ही पोरकेपणाची झाली होती. परंतु, आज अजित पवारांच्या अस्थि विसर्जनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे स्वतः बारामतीमध्ये सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज बारामती येथे शरद पवारांकडून नीरा नदीची पाहणी करण्यात आली.