Sharad Pawar : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबद्दल माहिती नाही, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय, राष्ट्रवादीने काय करावे हा त्यांचा निर्णय- शरद पवार
सुनेत्रा पवार यांच्याबद्दल जो निर्णय घेण्यात आला तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आहेत त्यांनी काय करावे हा त्यांचा निर्णय आहे. त्यावर मी काही भाष्य करणार नाही, असे खासदार शरद पवार यांनी म्हटले आहे.