सारसबागेपाठोपाठ शनिवार वाड्यात नमाज पठण; पुण्यातले हिंदुत्ववादी लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन झोपलेय का??
तळ्यातला गणपती सारसबाग इथे नमाज पठणाचा संतप्त प्रकार घडल्यानंतर त्या पलीकडे जाऊन काही जिहाद्यांनी हिंदवी स्वराज्य आणि मराठा साम्राज्याचे प्रतीक असलेल्या शनिवार वाड्यात जाऊन नमाज पठण केले. भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल वरून शनिवार वाड्यातला नमाज पठणाचा व्हिडिओ शेअर केला. त्यानंतर त्यांच्याच नेतृत्वाखाली सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी शनिवार वाड्यासमोर आंदोलन केले शनिवार वाड्यात नमाज पठण होत असताना पोलीस प्रशासन झोपले होते का??, असा परखड सवाल केला.