• Download App
    Shambhuraj Desai expunge remarks | The Focus India

    Shambhuraj Desai expunge remarks

    Jitendra Awhad : शिवरायांबाबतच्या विधानावरून विधानसभेत वादंग; दादा भुसे, नितेश राणेंचा आक्रमक पवित्रा; जितेंद्र आव्हाडांनी मागितली माफी

    विधानसभेत धर्मस्वातंत्र्य विधेयकावर चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाबाबत दिलेल्या एका संदर्भामुळे सभागृहात वादाचे वातावरण निर्माण झाले. इतिहासातील विविध दाखले देत असताना आव्हाड यांनी केलेल्या या विधानावर आक्षेप घेतला गेल्याने मोठा गदारोळ झाला. या पार्श्वभूमीवर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिलगिरी व्यक्त करण्याचे निर्देश दिले, ज्याची तातडीने दखल घेत आव्हाड यांनी सभागृहाची माफी मागितली आणि या वादावर पडदा पडला.

    Read more