Shambhu border : शेतकऱ्यांची शंभू सीमेवरून दिल्लीपर्यंत मोर्चाची घोषणा; 101 शेतकरी 21 जानेवारीला निघणार
हरियाणा-पंजाबच्या शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 21 जानेवारीला दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. यामध्ये 101 शेतकरी सहभागी होणार असल्याचे शेतकरी नेते सर्वन पंढेर यांनी सांगितले. केंद्र सरकार अद्याप चर्चेसाठी तयार नाही, त्यामुळे आम्ही आंदोलन तीव्र करणार असल्याचे त्यांनी सांगितले.