Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले यांचा ऐतिहासिक निर्णय- साताऱ्याचा शाही दसरा यंदा साधेपणाने; उत्सवाचा खर्च पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी यंदाचा ऐतिहासिक शाहू नगरीतील अर्थात सातारा शहरातील शाही दसरा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतला आहे. तसेच समाजहित लक्षात घेऊन दसरा उत्सवासाठी होणाऱ्या खर्चाची रक्कम पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.