Shah Rukh Khan : शाहरुखच्या IPL संघात बांगलादेशी खेळाडूवरून वाद; शिवसेनेने म्हटले- मुस्तफिजुरला संघातून काढा
बांगलादेशात हिंदूंच्या होत असलेल्या हत्यांविरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. दरम्यान, बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिजुर रहमानला शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाने IPL 2026 साठी 9.2 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. या प्रकरणावरून राजकीय वाद सुरू झाला आहे.