Senthil Balaji : सेंथिल बालाजी-पोनमुडी यांनी स्टॅलिन मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला; सुप्रीम कोर्टाने दिला होता इशारा
तामिळनाडूचे मंत्री व्ही. सेंथिल बालाजी आणि के पोनमुडी यांनी एमके स्टॅलिन यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. राज्यपाल आरएन रवी यांनी दोघांचेही राजीनामे स्वीकारले आहेत. मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या शिफारसी स्वीकारून राज्यपालांनी कारवाई केल्याचे राजभवनने एका निवेदनात म्हटले आहे.