Delhi Bomb Blast: दिल्ली बॉम्बस्फोटानंतर गुजरातमध्ये हाय अलर्ट; अहमदाबाद, वडोदरा, सुरत आणि राजकोटसह अनेक शहरांत शोध मोहीम
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाल्यानंतर अहमदाबाद, वडोदरा, सुरत आणि राजकोटसह गुजरातच्या अनेक शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील सर्व शहरांमध्ये पोलिस सतर्क आहेत आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.