Pahalgam attack : पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी स्थानिक नव्हे, पाकिस्तानी होते; पाकिस्तानच्या राष्ट्रीय डेटाबेसशी जुळले 6 पुरावे
२८ जुलै रोजी ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले तीन दहशतवादी स्थानिक नव्हते तर पाकिस्तानी होते. सुरक्षा एजन्सीच्या एका अधिकाऱ्याने पुराव्यांच्या आधारे वृत्तसंस्था पीटीआयला ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांकडून आणि चकमकीच्या ठिकाणाहून मिळालेल्या पुराव्यांवरून ते पाकिस्तानचे असल्याचे स्पष्ट झाले.