Prithviraj Chavan : बिहार निवडणुकीवर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया, कॉंग्रेसने आत्मपरीक्षण करणे गरजेचे, जागावाटपात उदारमतवादी भूमिका घ्यायला हवी होती
बिहार निवडणुकीच्या निकालांवर देशभरात चर्चा सुरू असताना, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या अंतर्गत गोंधळ, चुकीचे अंदाज आणि अपयशी रणनीतीवर थेट बोट ठेवले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना चव्हाण यांनी पक्षाला आरसा दाखवणारे वक्तव्य केले असून, त्यांनी काँग्रेसच्या सल्लागारांच्या निर्णयक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.