Mumbai Municipal Corporation, : मुंबई मनपात शिवसेना-भाजपचे 150 जागांवर एकमत; अमित साटम यांनी सांगितला जागा वाटपाचा फॉर्म्युला, उर्वरित 77 जागांचा लवकरच निर्णय
मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन पक्षात जागावाटपावरून आज दुसरी बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही पक्षांकडून 150 जागांवर एकमत झाल्याचे भाजप नेते अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले आहे. तसेच उर्वरित 77 जागांवर लवकरच चर्चा होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच मुंबई महापालिकेसाठी जागावाटपाचा देखील फॉर्म्युला अमित साटम यांनी यावेळी सांगितला. मुंबई महापालिकेला विकून खाणाऱ्यांना घरी बसवण्यासाठी महायुती सज्ज असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.