Ukraine : रशियाच्या दोन तेलवाहू जहाजांवर युक्रेनचा ड्रोन हल्ला; इतर देशांचे झेंडे लावून रशियन तेल वाहतूक करत होते
रशियाच्या दोन तेलवाहू जहाजांवर (टँकर) शनिवारी ब्लॅक सीमध्ये पाण्याखालील ड्रोन (सी बेबी) ने हल्ला केला. युक्रेनने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दोन्ही जहाजे रशियाच्या ‘शॅडो फ्लीट’चा भाग मानली जातात. ही जहाजे निर्बंधांपासून वाचण्यासाठी वेगवेगळ्या देशांचे झेंडे लावून रशियन तेल वाहतूक करत होती.