Semiconductor : द फोकस एक्सप्लेनर : गूढ आगीत जळून खाक झाले होते भारताचे सेमीकंडक्टरचे स्वप्न, 1989 मध्ये नेमके काय घडले?
भारताला जगात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे नेणारे एक मोठे स्वप्न १९८९ साली मोहाली येथे लागलेल्या एका आगीत जळून खाक झाले. मोहालीतील सेमीकंडक्टर कॉम्प्लेक्स लिमिटेड (SCL) हे देशातील पहिले चिप उत्पादन केंद्र होते. जगभरात त्या काळी ज्या काही देशांकडे अत्याधुनिक चिप बनवण्याची क्षमता होती, त्यामध्ये भारताचाही समावेश होत होता. परंतु ७ फेब्रुवारी १९८९ रोजी लागलेल्या आगीत हे संपूर्ण स्वप्न उद्ध्वस्त झाले.