AAP Election Commission : काँग्रेसनंतर आता ‘आप’चा निवडणूक आयोगावर आरोप; निवडणूक आयोगाने दावा फेटाळला
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पाठोपाठ आता आम आदमी पक्षाने (आप) निवडणूक आयोगावर मतचोरीचा गंभीर आरोप केला आहे. आप नेते सौरभ भारद्वाज यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन अरविंद केजरीवाल यांच्या नवी दिल्ली मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान कापल्याचा दावा केला.