Saudi Arabia : हजपूर्वी सौदीने भारत-पाकचे व्हिसा रद्द केले; नोंदणीशिवाय हजला पोहोचणाऱ्यांना रोखण्यासाठी निर्णय
सौदी अरेबियाने १४ देशांसाठी व्हिसा सेवा तात्पुरती स्थगित केली आहे. या देशांमध्ये भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. उमराह, व्यवसाय आणि कुटुंब भेटींसाठी व्हिसावर जूनच्या मध्यापर्यंत बंदी लागू शकते. या काळात मक्का येथे हज यात्रा होईल.