Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये राज्यसभेच्या 3 जागा नॅशनल कॉन्फरन्सने जिंकल्या, भाजपने एक जागा जिंकली
शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक झाली. नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) ने तीन जागा जिंकल्या, तर भाजपने एक जागा जिंकली. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतरची ही पहिलीच राज्यसभेची निवडणूक होती. काही आमदारांनी केलेल्या क्रॉस-व्होटिंगमुळे भाजपचा विजय शक्य झाला.