Sreelekha Thiruvananthapuram : केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर होण्याची शक्यता; तिरुवनंतपुरममधून श्रीलेखा विजयी; राज्यातील पहिल्या महिला IPS अधिकारी
केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत NDA ला मोठे यश मिळाले आहे. युतीने तिरुवनंतपुरम महानगरपालिकेच्या 101 प्रभागांपैकी 50 प्रभागांवर विजय मिळवला आहे. गेल्या 45 वर्षांपासून येथे डाव्या लोकशाही आघाडीचे (LDF) वर्चस्व आहे. LDF ला 29 आणि काँग्रेस आघाडीला (UDF) 19 प्रभागांमध्ये विजय मिळाला आहे.