Sarsanghchalak : सरसंघचालक म्हणाले- भारत शेजाऱ्यांना इजा पोहोचवत नाही; जनतेचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी शनिवारी पुन्हा एकदा पहलगाम हल्ल्यावर विधान केले. पाकिस्तानचे नाव न घेता ते म्हणाले, ‘अहिंसा हा आपला स्वभाव आहे, आपले मूल्य आहे, परंतु काही लोक बदलणार नाहीत, तुम्ही काहीही केले तरी ते जगाला त्रास देत राहतील, मग आपण त्यांच्याबद्दल काय करावे?’