Sarsanghchalak Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- जगाला विविधता स्वीकारणाऱ्या धर्माची गरज; जसे की हिंदू धर्म
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी बुधवारी म्हटले की, जगाला अशा धर्माची आवश्यकता आहे जो हिंदू धर्माप्रमाणे विविधतेला स्वीकारतो.नागपूरमधील धर्म जागरण न्यासच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात भागवत बोलत होते. ते म्हणाले की, धर्म आपल्याला एकतेची भावना बाळगण्यास आणि विविधतेचा स्वीकार करण्यास शिकवतो. आपण विविध आहोत, पण वेगळे नाही. अंतिम सत्य हे आहे की आपण वेगळे दिसू शकतो, परंतु प्रत्यक्षात आपण एक आहोत.