Sarpanch Deshmukh murder case : सरपंच देशमुख हत्येप्रकरणी आरोपींच्या स्कॉर्पिओ कारमध्ये सापडले 19 पुरावे; तिघांनी दिली खुनाची कबुली
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात जप्त करण्यात आलेल्या काळ्यास्कॉर्पिओत एकूण १९ पुरावे सीआयडीलाआढळले आहेत. कारचा फॉरेन्सिकतपासणी अहवाल आला असून डाव्यादरवाजाच्या काचेवरील दोन ठसे आरोपीसुधीर सांगळेचे असल्याचे समोर आलेअाहे. या गुन्ह्यातील आरोपी जयराम चाटे, महेश केदार आणि सुदर्शन घुले या तिघांनी पुण्याच्या मॅजिस्ट्रेटसमोर कबुली जबाबदिला होता. त्यांच्या कबुलीजबाबाची प्रत आरोपीच्या वकिलांना दिली आहे.