Ravindra Chavan : रवींद्र चव्हाणांचा ठाकरेंवर हल्लाबोल- सत्तेसाठी मराठी अस्मितेचा सोयीस्कर विसर; कॉंग्रेससह जाऊन संयुक्त महाराष्ट्राच्या 105 हुतात्म्यांचा अपमान
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी 105 हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानावर गोळीबार करण्याचे पाप कॉंग्रेसचे आहे, हे इतिहासात नोंदलेले सत्य असूनही ठाकरे गट जाणीवपूर्वक त्याकडे डोळेझाक करत आहे, अशीह टीका चव्हाण यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.