Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्याप्रकरणी 6 आरोपींना न्यायालयीन कोठडी; कराडच्या जामिनावर उद्या सुनावणी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सध्या पोलिस कोठडीत असलेल्या सुदर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदार, सुधीर सांगळे, प्रतीक घुले व सिद्धार्थ सोनवणे या 6 आरोपींना शनिवारी बीडच्या विशेष मकोका न्यायालयाच्या न्या. सुरेखा पाटील यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली