Dhananjay Munde : वंजारी समाजाच्या अधिवेशनात धनंजय मुंडे भावुक; त्या 200 दिवसात 2 वेळा मरता-मरता राहिलो
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्यामुळे विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितला व तो त्यांना द्यावा देखील लागला. त्यानंतर पासून धनंजय मुंडे हे फारसे कुठल्या सामाजिक कार्यक्रमात फारसे आले नव्हते. आज त्यांना वंजारी समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात बोलावण्यात आले असता, भाषण करताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.