Sanjay Roy : कोलकाता ट्रेनी डॉक्टर रेप-हत्येप्रकरणी संजय रॉय दोषी; सोमवारी सुनावणार शिक्षा
कोलकाता येथील आरजी कार रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात सियालदाह न्यायालयाने मुख्य आरोपी संजय रॉयला दोषी ठरवले आहे. न्यायमूर्ती अनिर्बान दास यांनी दुपारी 2.30 वाजता निकाल दिला आणि सोमवारी (20 जानेवारी) शिक्षा जाहीर केली जाईल असे सांगितले.