• Download App
    Sanjay Raut Dada Bhuse Compromise | The Focus India

    Sanjay Raut Dada Bhuse Compromise

    Dada Bhuse : संजय राऊत यांच्या दिलगिरीनंतर दादा भुसेंकडून अब्रुनुकसानीचा दावा मागे; कोर्टात समझोता

    मालेगाव येथील न्यायालयात शनिवारी घडलेल्या घडामोडींनी राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली. मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याच्या सुनावणीसाठी खासदार संजय राऊत स्वतः उपस्थित राहिले. मात्र यावेळी वातावरण आधीपेक्षा वेगळे होते. न्यायालयीन प्रक्रियेनंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र येत माध्यमांशी संवाद साधला आणि वादावर पडदा टाकल्याची घोषणा केली.

    Read more