Sanjay Jha : ‘बिहारमध्ये यंदा NDA २०१०च्या जागांचा विक्रम मोडणार’
या वर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारीही सुरू झाली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचा उत्साह दिसू लागला आहे. दरम्यान, एनडीएच्या एका नेत्याने विधानसभा निवडणुकीच्या निकालांबाबत एक मोठा दावा केला आहे. जनता दल युनायटेडचे नेते संजय झा म्हणाले की, यावेळी एनडीए २०१० मध्ये जिंकलेल्या जागांचा विक्रम मोडेल.