OBC Leaders : पुण्यातील बैठकीत हाकेंसह ओबीसी नेत्यांचा आक्रमक पवित्रा; संघर्ष यात्रा काढून ओबीसी आरक्षणाचे रक्षण करू-हाके
मुंबईतील मराठा आंदाेलनाला शह देत ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय पुण्यातील बैठकीत घेण्यात आला. वंशावळ समितीला मुदतवाढ जरांगे यांच्या दबावाखाली दिली गेली, अशी टीका करीत सरकार बेजबाबदार वागत आहे, असा संताप लक्ष्मण हाके यांच्यासह ओबीसी नेत्यांनी व्यक्त झाला.