भीषण समस्यांच्या निराकरणातूनच पूर्वांचलात संघकार्य; ६४ वर्षे प्रचारक असलेले शशिकांत चौथाईवाले यांचे अभिष्टचिंतन!!
पूर्वांचलातील समस्यांच्या जाणिवेबरोबरच जनजाती समाजात विश्वास निर्माण करण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांनी केले. तेथील भीषण समस्यांच्या निराकरणातूनच पूर्वांचलात संघकार्य उभे राहिले, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांनी व्यक्त केले.