संघ शताब्दी : पुणे महानगरात 57 संचलने, 23,218 तरुणांचा सहभाग; संविधान रक्षणाचा निर्धार!!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी पथसंचलनांचे शहरात मोठ्या प्रमाणावर स्वागत झाले. संचलन मार्गावर विविध संस्थांकडून स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या, तर नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी केली. पुणे महानगरातील ५५ नगरांमध्ये ५७ स्थानांवर घोष सहित संचलने झाली, ज्यामध्ये २३ हजार २१८ युवा स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता.