Sandipan Bhumare : संदीपान भुमरेंचा चालक 150 कोटींच्या भूखंडाचा मालक? आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला हैदराबादच्या एका कुटुंबाने तब्बल 150 कोटींची जमीन भेट म्हणून दिल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या प्रकरणी परभणीच्या एका वकिलाने तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी खासदार संदीपान भुमरे व त्यांचे आमदार सुपुत्र विलास भुमरे हे दोघेही अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.